Ad will apear here
Next
आजीबाईंच्या शाळेत चंदन परिषदेचा परिमळ
फांगणे गावात आयोजन


ठाणे :
ठाणे जिल्ह्याच्या मुरबाड तालुक्यातील नाणेघाटाच्या पायथ्याजवळ वसलेले फांगणे हे एक छोटेसे गाव. याच गावात दोन वर्षांपूर्वी मोतीराम दलाल चॅरिटेबल ट्रस्टच्या मदतीने योगेंद्र बांगर यांनी शिक्षणाची आगळीवेगळी क्रांती घडली होती. पुढे फांगणे हे गाव ‘आजीबाईंची शाळा’ उपक्रमामुळे नावारूपाला आले. या उपक्रमशील फांगणे गावात चंदन परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. गावातील प्रत्येक घरात चंदनाचे एक झाड लावण्याचा मानस या परिषदेत मान्यवरांच्या उपस्थितीत पूर्ण केला गेला. 

या वेळी उपस्थितांना चंदनाच्या वृक्षाचे महत्त्व व फायदे सांगण्यात आले. चंदन लागवड कशी करावी, रोपे किती अंतरावर लावायची, त्यांची निगा कशी राखायची, उत्पादन किती मिळते याबद्दलही मार्गदर्शन करण्यात आले. चंदन लागवडीनंतर सुरुवातीची तीन वर्षे चांगली निगा घ्यावी लागते. रोपांना योग्य मात्रेत खत आणि पाणी दिल्याने जोमदार वाढ होते. 

‘चंदनाची लागवड हा अभिनव प्रयोग अनेकांना मार्गदर्शक ठरेल. या प्रयोगाच्या यशस्वितेनंतर कृषी क्षेत्रात निश्चितपणे चंदनाचा आर्थिक परिमळ पसरल्याशिवाय राहणार नाही,’ असे मत मुरबाड उपविभागीय पोलिस अधिकारी राजेंद्र मोरे यांनी व्यक्त केले. 



आरोग्य व इतर सामाजिक विषयांवर ठाणे व पालघरमध्ये भरीव कामगिरी करणाऱ्या जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे संस्थापक नीलेश भगवान सांबरे यांनी या एकतेबद्दल व नावीन्यपूर्ण उपक्रमांबद्दल फांगणे ग्रामस्थांचे व आजीबाईंच्या शाळेतील सर्वं आजीबाईंचे, तसेच सर्वांना एकत्रित घेऊन काम करणाऱ्या शाळेचे संस्थापक शिक्षक योगेंद्र बांगर यांचे मनःपूर्वक कौतुक केले. तसेच चंदनाच्या वृक्षाचे महत्त्व व फायदे सांगून ते जगविण्यासाठी प्रयत्नशील राहण्याचे आवाहन ग्रामस्थांना केले. 

फांगणे गावातील सर्व महिलांसाठी महिला सक्षमीकरण कार्यक्रमांतर्गत स्वयंरोजगार संधी उपलब्ध करणार असल्याचे नीलेश सांबरे यांनी या वेळी सांगितले. आजीबाईंच्या नावे सुरू होणाऱ्या अगरबत्ती लघुउद्योगाचे उद्घाटन या वेळी करण्यात आले. या कार्यक्रमाकरिता एपीआय धनंजय पोरे, चंदन उत्पादक संघाचे श्री. गोरे, वन अधिकारी कपिल पवार आदी मान्यवर उपस्थित होते.

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/HZLYBR
Similar Posts
शिवळे महाविद्यालयात जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धा ठाणे : आजची तरुणाई सजग आहे. ती घडणार्‍या घडामोडींवर बोलू इच्छिते. देशाच्या विकासात सकारात्मक बदल घडविणारी आपली मत सर्वांसमोर मांडण्यासाठी त्यांना व्यासपीठाची गरज आहे. हे लक्षात घेऊन केंद्र सरकारच्या युवा कार्यक्रम आणि खेळ मंत्रालयाचे ठाणे नेहरू युवा केंद्र आणि झुंज प्रतिष्ठान यांच्या वतीने मुरबाड येथील
डॉ. धानके यांचा गुणवंत अधिकारी पुरस्काराने गौरव ठाणे : पशुसंवर्धन विभागात सहाय्यक पशुधन विकास अधिकारी म्हणून कार्यरत असलेले डॉ. दिलीप धानके यांनी शासकीय सेवेत केलेल्या विशेष उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांची ठाणे जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभागाने गुणवंत अधिकारी म्हणून निवड केली होती. म्हसा यात्रेत आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय पशु-पक्षी प्रदर्शनाच्या भव्य
सिद्धगडावर जागवल्या गेल्या क्रांतीच्या स्मृती मुरबाड : ठाणे जिल्ह्याच्या मुरबाड तालुक्यात सिद्धगडाच्या घनदाट जंगलात आझाद दस्त्याचे संस्थापक वीर भाई कोतवाल व वीर हिराजी पाटील यांनी भारतीय स्वातंत्र्यलढ्यात आपल्या प्राणाची आहुती दिली. त्यांच्या स्मृती जागविण्यासाठी दर वर्षी दोन जानेवारी रोजी रात्रभर सिद्धगड स्मारक समितीतर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते
शिवळे महाविद्यालयात लेखन, काव्य व संगीत कार्यशाळा मुरबाड (ठाणे) : ज्येष्ठ संगीतकार सुधीर फडके (बाबूजी), ज्येष्ठ गीतकार ग. दि. माडगूळकर (गदिमा) आणि महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व पु. ल. देशपांडे (पुलं) यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त राज्य शासनाचा सांस्कृतिक कार्य संचालनालय विभाग व मुरबाड-शिवळे येथील जनसेवा शिक्षण मंडळाच्या शांताराम भाऊ घोलप कला,

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language